३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार मंगळवारी बारावीची परीक्षा
३३केंद्रावर १३हजार विद्यार्थी देणार मंगळवारी बारावीची परीक्षा
हिंगोली - जिल्ह्यातील३३परीक्षा केंद्रावर मंगळवारी( ता.१८) फेब्रुवारी रोजी १३हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यंदाही कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दक्षता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी. पावसे, मलदोडे, वडकुते, पळसकर आदींची उपस्थिती होती. इयत्ता बारावी परीक्षा १८फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीमध्ये तेहतीस परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर इयत्ता दहावी परीक्षा तीन ते २३ मार्च दरम्यान होणार असून परीक्षेला दोन हजार वीस विद्यार्थी बसले आहेत.ही परीक्षा ५३केंद्रावर घेतली जाणार आहे. बारावीसाठी तेहतीस परीक्षा केंद्र जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहेत. परीक्षा सुरळीत व कॉपीला आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यात पाच भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत.
प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना आपल्या तालुक्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. इयत्ता दहावीसाठी १८ हजार २२५ तर बारावी साठी १३ हजार २५२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. यंदाही कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.