शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वतयारी
शिवजयंती महोत्सवा निमित्त पूर्वतयारी करण्यासाठी महिलांची आढावा बैठक
महिला समिती ठिकठिकाणी महिलांच्या बैठका घेणार
हिंगोली -
शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पूर्वतयारी नियोजन व आढावा बैठक येथील एनटीसी परिसरातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान येथे पार पडली . या शिवजयंती उत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी महिला समितीकडून प्रभाग नुसार बैठका घेणार असल्याचे ठरले.
या बैठकीत शिवजयंती महोत्सवात विविध स्पर्धा, दिपोत्सव, भव्य मिरवणूक व इतर कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी चर्चा करूण शहरातील विविध प्रभागात व परिसरात शिवजयंती महोत्सवातील कार्यक्रमाची माहिती देण्या करीता महिलांच्या बैठका गुरूवार दि.१३ फेब्रुवारी पासून महिला समितीच्या पुढाकाराने घेण्याचे ठरले आहे. सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी हिंगोली येथे महिला समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरूवातीला हिंगणघाट येथील झालेल्या विकृतीची एक निष्पाप लेक बळी ठरली. त्या लेकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महिलांच्या सहभाग असलेल्या रांगोळी स्पर्धा, महिला कबड्डी स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, भव्य दिपोत्सव, भव्य मिरवणूक व शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात हजारो महिला सहभागी करण्यासाठी नियोजन व पूर्वतयारी आढावा घेण्यात आला. यावेळी शहर व परिसरात महिला समिती ठिकठिकाणी दि.१३ फेब्रुवारी पासून महिला बैठका घेणार आहे. दि.१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दिपोत्सवात हजारो महिला सहभागी होणार आहेत. शिवजयंती महोत्सवातील भव्य मिरवणूकी मध्ये सर्व जाती धर्मातील शिवप्रेमी महिला भगिनी सहभागी करण्यासाठी नियोजन व आढावा बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला महिला समितीच्या प्रमुख सौ. ज्योती कोथळकर यांच्यासह समिती सदस्या डाॅ. सौ. उमा सोनी, सौ.वृशाली पाटील, सौ. वंदना आखरे, सौ. योगिता देशमुख, सौ.सुषमा देशमुख, सौ. छाया मगर, सौ. जया पवार, सौ. सौ. स्मिता वारे, सौ. अर्चना कोकाटे, सौ. मालती कोरडे, डाॅ. राधिका देशमुख, सौ. शितल सावके, सौ. जगजितकौर अलग, सौ. वैशाली ढोकळे, सौ. माधवी पाटील गोरेगावकर यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.