लिगो प्रकल्पाकडे जमीनीचे हस्तांतरण वैज्ञानिकाचे निवासस्थाने उभारणीचे काम लवकरच
लिगो प्रकल्पाकडे जमीनीचे हस्तांतरण
वैज्ञानिकाचे निवासस्थाने उभारणीचे काम लवकरच
हिंगोली - तालुक्यातील जामवाडी भागातील सात हेक्टर ऐंशी आर जमीन मंगळवारी (ता.18) शासनाने अनुउर्जा विभागाचे अधिकाऱ्याकडे लिगो प्रकल्पाची जमीन हस्तातंरीत केली आहे. यामुळे वैज्ञानिकाच्या निवासस्थाचा मार्ग मोकळा झाला आहे.
औंढा तालुक्यातील दुधाळा परिसरात भुर्गभातील लहरीचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पहिली व जागतीक स्तरावील तीसरी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. मागच्या तीन ते चार वर्षापासून जमीन हस्तांतराचे काम सुर आहेत. यात शासकिय जमीन, वनविभाग व खाजगी अशी एकून 183 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यात आले असून त्याचा मावेजा देखील लाभार्थ्याना देण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी हिंगोली तालुक्यातील जामवाडी शिवारातील गट क्रमांक 36 मधील बारा हेक्टर सोळा आर या पैकी सात हेक्टर ऐंशी आर जमीन ज्याची चतुसिमा पुर्वेस गट क्रमांक 32, 35. 37 तर पश्चीमेस व दक्षिणेस लिंबाळा जामवाडी शिवरास्ता, उतरेस गट क्रमांक 36 ची शिल्लक जमीन व आरटीओ विभागाच्या कार्यालय आहे. भारत सरकारच्या अनुउर्जा विभागातर्फे मुख्य प्रशासकिय अधिकारी यांच्या समक्ष जमीन हस्तांतराचा पंचनामा करण्यात आला. यावेळी अदिनाथ कायंदे, रामकिशन जैस्वाल, नामदेव मुकाडे, शेषराव कऱ्हाळे, सचिन नागरे यांच्या उपस्थितीत सदर जमीनीचा पंचनामा करून सात हेक्टर ऐंशी आर जमीन लिगो प्रकल्पाकडे हस्तातंरीत करण्यात आली. त्यामुळे या जमीनीव वैज्ञानिकांची व कर्मचाऱ्याची निवासस्थाने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.