मराठवाड्यातील महत्वपूर्ण रेल्वे योजनांना गती देण्यात यावी

मराठवाड्यातील महत्वपूर्ण रेल्वे योजनांना गती देण्यात यावी

 

परभणी ( प्रतिनिधी ) दि.17ः-

 


 

मराठवाड्यात सर्वात जास्त प्रवाशी वर्दळ असलेल्या परभणी-मनमाड या मंजुर करण्यात आलेल्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण युद्धस्तरावर सुरू करण्यात यावे. मराठवाडा विभागाची राजधानी आणि  महत्वपूर्ण पर्यटन केंद्र औरंगाबाद स्थानकावर पीटलाइन सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या विकासासाठी निर्माणाधीन परळी-बीड-नगर-कोळसेट (कल्याण जवळ) अकोला-खंडवा आणि नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वे मार्गांना पूर्ण करण्यात यावे.

सोबतच विभागात आवश्यक असणार्या औरंगाबाद-नगर-पुणे,  औरंगाबाद-चाळीसगाव, नांदेड-बिदर, औरंगाबाद-बीड-सोलापूर, जालना-खामगाव, परभणी-जिंतूर- लोणार- मेहकर-बुलढाणा- मलकापूर आणि लातूर-गुलबर्गा दरम्यान नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी देऊन तत्काळ निर्मिती करण्याची गरज आहे.

या नवीन रेल्वे मार्गांसोबत पुणे व पश्चिम महाराष्ट्राला जवळून जोडणार्या  पानगाव-लातूर, अमरावती, नागपूर भागांना जवळून जोडणार्या वाशीम-बडनेरा, शिर्डीला जवळून जोडणार्या  रोटेगाव-पुणतांबा, आणि दक्षिण भारताला जवळून जोडणार्या भालकी-हुमनाबाद दरम्यान नवीन बायपास मार्ग निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सोबत परभणी आणि परळी स्थानकांजवळ बायपास मार्ग निर्माण करण्याची मागणी मध्य रेल्वे विभागाचे  महाव्यवस्थापक श्री गजानन मल्या यांच्याकडे   मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, हर्षद शहा शंतनु डोईफोडे, डॉ राजगोपाल कालानी, रितेश जैन, किरण चिद्रवार, उमाकांत जोशी, अमित कासलीवाल, ऍड. केदार जाधव, ऍड. अटल पुरुषोत्तम, श्रीकांत गडप्पा, दयानंद दिक्षीत, कादरीलाला हाशमी, प्रदीप कोकडवार, इत्यादींनी केली आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा