मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा सातासमुद्रापार ! पुण्याचा 'छावा'  झळकणार लंडन फॅशन वीक मधे !  




मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा सातासमुद्रापार ! पुण्याचा 'छावा'  झळकणार लंडन फॅशन वीक मधे !  


 



अनिल चौधरी, पुणे


 


पुण्यातील 'तष्ट' या संस्थेस लंडन मधील  हीथ्रो येथील रॅडिसन ब्ल्यु येथे आयोजित 'लंडन फॅशन वीक' मधे दुसर्यांदा आमंत्रित करण्यात आले असून यंदा 'नॅशनल एशियन वेडिंग शो' या संकल्पने अंतर्गत 'तष्ट' संस्था छत्रपती संभाजी महराज यांना समर्पित 'छावा' श्रेणी सादर करणार आहेत. लंडन येथे फॅशन कोरिओग्राफर तन्व्ही खरोटे आणि अभिनंदन देशमुख यांच्या दिग्दर्शनांतर्गत १५ महिला आणि १५ पुरुष मॉडेल्स हि श्रेणी सादर करणार असल्याची माहिती संस्थेचे दीपक माने आणि रविंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. माने म्हणाले, आत्तापर्यंत फॅशन शो च्या माध्यमातून अनेक  संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव गेल्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही “शिवजातस्य” या फॅशन शो मधून पेश केले. महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आम्ही केला होता . 


 


पवार म्हणाले, शिवकालीन संस्कृती  बरोबरच पेशवाई आणि मोघल साम्राज्यातील पेहेराव ही आम्ही सादर केले आहेत. नविन पिढी ला शिवकालीन वस्त्र परंपरा माहित व्हावी या दृष्टीने तरुणाई ला भावणारे 'फॅशन शो'  हे माध्यम आम्ही सादरीकरणासाठी निवडले. भविष्यातल्या फॅशनचा कल हा लोकपरंपरा आणि समकालीन वस्त्र यांची सांगड घालणारा असल्या कारणाने छत्रपती संभाजी महाराजांना समर्पित अशी ही छावा श्रेणी पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधणारी आहे. रंगभूषाकार वेशभूषाकार असे सर्वजण मिळून ३५ जण या दौऱ्यावर जाणार असल्याचे दीपक माने आणि रवींद्र पवार यांनी सांगितले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा