देवस्थानची जमीन ग्रामपंचायतच्या नावे करा
देवस्थानची जमीन ग्रामपंचायतच्या नावे करा
कळमनुरी - तालुक्यातील पिंपरी येथील तीन हेक्टर ८१ आर जमीन भोगवाटदाराचे नाव महादेव देवस्थानची आहे. परंतू ती जमीन गावातील दोघेजण वाहिती करीत आहेत. या बाबत चौकशी करून सदर जमीन ट्रस्टच्या नावे किंवा ग्रामपंचायच्या नावे करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या बाबत सरपंच अरुणा जाधव यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमुद आहे की. पिंपरी येथील सर्वेनंबर 157 मधीत 3 हेक्टर 81 हाजर जमीन भोगवाटदाराचे नाव महादेव देवस्थानची आहे. परंतू ती जमीन गावातील संदीप पुंड व गजानन पुंड दोघेजण जमीनीची वाहिती करतात पंरतू हे दोघे जमीनीचे उत्पन्न स्वतःच्या कुटुंबावर खर्च करतात. मात्र देवाच्या मंदिरावर कोणाताही खर्च करीत नाहीत व गावातील ग्रामस्थ मंदिरावर खर्च करा असे म्हणाले असता वाद घालतात. या प्रकरणाची चौकशी करून सदर जमीन ट्रस्टच्या नावे किंवा ग्रामपंचायच्या नावे करावी त्यामुळे कोणताचा वाद होणार नाही अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच अरुणा जाधव, यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
![]() | ReplyReply to allForward |