हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नगरी दुमदुमली
हर हर महादेवाच्या जयघोषात औंढा नगरी दुमदुमली
हजारो भाविक भक्तांनी घेतले नागनाथाचे दर्शन
हिंगोली - बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ या तीर्थावर श्री नागनाथ प्रभुचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर हरहर महादेव, चा गजर करीत हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
यावर्षी देवस्थानच्या वतीने महाशिवरात्र उत्सव हा आगळावेगळा पद्धतीने या ठिकाणी साजरा केला. त्यामध्ये मंदिरावर पूर्णविद्युत रोषणाई व मंदिरातील आतमध्ये सर्वत्र फुलांनी मंदिर सजवले होते. यावेळी भाविक भक्तांना एक आकर्षक मंदिराची रोषणाई पाहावयास मिळाली. देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विधानसभेचे आमदार संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते महापूजा झाली, व दोन वाजता भाविकांच्या दर्शनासाठी श्री नागनाथ मंदिर खुले करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाप्रसाद व फिल्टर पाणी वाटप करण्यात आले.
मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवस्थानच्या वतीने
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. व पोलीस प्रशासनाची मंदिर परिसर परिसरासह औंढा नगरीत करडी नजर होती. तसेच ,शिवलिंगाच्या मुख्य प्रवेश द्वारावर वेगवेगळ्या फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे . विद्युत रोषणाई व फुलाची आकर्षक सजावट केल्याने मंदिरासह परिसर उजळून निघाला
आहे. महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांतून पहिला मानकरी निवडला जातो पाचव्यांदा हिंगोली जिल्ह्यातील पान कनेरगाव येथील शिवराज रमेश आप्पा आकमार या भाविक भक्तांना मिळाला. देवस्थानच्या वतीने त्यांचा पत्नीसह मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार केला.
महाशिवरात्रीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त हे श्री च्या दर्शनासाठी औंढा नगरीमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये कर्नाटक, आंध्रा, तामिळनाडू सह मराठवाडा हिंगोली, तेलंगणा ,परभणी, नांदेड, या ठिकाणावरून भावीक भक्त हे दिंड्या घेऊन हर हर महादेव., बम बम भोले गजरामध्ये औंढा नगरीमध्ये रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी दिवसभर श्री नागनाथ देवस्थानचे विश्वस्त रमेशचंद्र बगडीया, गणेश देशमुख, शिवाजी देशपाडे , डॉक्टर विलास खरात, आनंद निलावार, काळे,वैजेनाथ पवार आदी मंदिरात दिवसभर तळ ठोकून बसले होते. एकदम शांततेच्या वातावरणामध्ये भाविक भक्तांनी श्री नागनाथाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.