गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने दै.सामना चे पत्रकार माणिक केंद्रे यांचे दुखद निधन, 


प्रतिनिधी : पाथरी 

गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने दै.सामना चे पत्रकार  माणिक केंद्रे यांचे दुखद निधन

 

पाथरी:-दैनिक सामनाचे पाथरी तालुका प्रतिनिधी माणिक केंद्रे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

  सेलू येथे गॅस सिलेंडरच्या गळती मुळे स्फोट झाल्याने पत्नी सह माणिक केंद्रे हे गंभिर जखमी झाले होते त्यांच्यावर सेलू,परभणी,औरंगाबाद ,अकोला येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना बुधवार १९ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांचे दुखद निधन झाले.माणिक केंद्रे हे पाथरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी निर्भिड पणे रोकठोक लिखान केले होते.पत्रकारीतेत सक्रीय असतांना सामाजिक कार्यातही ते सातत्याने पुढे येत.मनमिळाऊ स्वभावा मुळे मोठा मित्रपरीवार होता. बुधवारी त्यांच्या निधनाची दुख:द वार्ता येताच मुदगल या त्यांच्या गावा सह मित्रपरिवार दुखात बुडाला गुरूवारी सकाळी मुदगल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार माणिक केंद्रे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,एक मुलगी, आई,भाऊ,बहीन असा परिवार आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा