तब्बल दोन वर्षानंतर हिंगोली पुरवठा विभागाला मिळाला कायमस्वरूपी अधिकारी
अरुणा संगेवार नवे जिल्हा पुरवठा अधिकारी
हिंगोली - राज्यातील जानेवारी महिन्यात उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नत्या झाल्या त्यात लातूर येथील तहसीलदार अरुणा संगेवार यांची हिंगोली जिल्हा पुरवठा अधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. मात्र त्या रजेवर गेल्या होत्या. शुक्रवारी (ता.१४) त्यांनी पदभार घेताच गोविंद रणवीरकर यांनी पदभार देऊन स्वागत केले.
जिल्हा पुरवठा विभागाला तब्बल दोन वर्षानंतर कायमस्वरूपी अधिकारी मिळाल्याने आता कामे मार्गी लागतील अशी आशा रास्तभाव दुकान दारांना लागली आहे. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांच्या रिक्त जागी प्रभारी म्हणून उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता. त्यानंतर बांगडे यांनी सहा महिने पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांनीही यवतमाळ येथे बदली करून गेल्याने पुन्हा हा विभाग प्रभारीवरच आला. पुन्हा
रणवीरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देऊन पुरवठा विभागाचा डोलहारा सांभाळला. अखेर उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नत्या झाल्याने लातूर येथील तहसीलदार अरुणा संगेवार यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी पदी पद स्थापना देण्यात आली. संगेवार यांनी शुक्रवारी गोविंद रणवीरकर यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी रणवीरकर यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पुरवठा विभागाला कायमस्वरूपी अधिकारी मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील आणि पुरवठा विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार ,धान्यदी मालाची अफरातफर रोखण्याचे मोठे आव्हान संगेवार यांच्यापुढे उभे आहे. पुरवठा विभागाला लागलेली कीड त्या कशाप्रकारे झटकून काढतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.