विहीरीत पडून एकाचा मृत्यू
विहीरीत पडून एकाचा मृत्यू
कळमनुरी - तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या भुरक्याची वाडी येथे एकाचा विहीरीच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.18) घडली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या भुरक्याची वाडी येथील गंगाधर तुकाराम कोकरे (वय 36) हे मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास गणेश खोकले यांच्या विहीरीतील पाण्यात पडुन त्यांचा मृत्यू झाला. या बाबत शेषराव कोकरे यांच्या खबरीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.