कासारवाडा येथून दहा लाखाचे दागिने पळविले
कासारवाडा येथून दहा लाखाचे दागिने पळविले
हिंगोली - घरातील ब्याग कापून त्यातील ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा एक डबा त्यात २६७ ग्रॅम ८०० मिलिग्राम अंदाजे दहा लाख ७६ हजार २० रुपयांचे दागिने पळविल्याची घटना १० फेब्रुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली असून गुरुवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कासारवाडा येथील प्रदीप उपाध्ये हे खाजगी नोकरी करीत आहेत. त्यांनी घरात एका ब्यागेत सोन्याच्या दागिन्यांचा एक डब्बा ठेवला होता. त्यामध्ये २६७ ग्रॅम ८०० मिलिग्राम असा एकूण दहा लाख ७६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने सोमवारी (ता.१०ते ११)
रोजी रात्री सवा नऊच्या सुमारास पळविले आहे. गुरुवारी उपाध्ये यांनी पाहताच घरातून दागिने पळविल्याचे उघडकीस येताच त्यांनी शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केनेकर करीत आहेत.