कनेरगावात दोन गटात हाणामारी पाच जण जखमी
कनेरगावात दोन गटात हाणामारी पाच जण जखमी
दुचाकीला धक्का लागल्याचे कारण
हिंगोली - तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे.
या बाबत माहिती अशी की, कनेरगाव नाका येथील देवठाणा (भोयर) येथील प्रमोद धवसे व त्याची आई मायाबाई नंदराज धवसे हे पन्नास किलो गहू विकण्यासाठी कनेरगाव येथील गजानन ट्रेडींग कंपनी येथे दुचाकीवरून आले होते. प्रमोद हा गव्हाचे चुगंडे दुचाकीवरून काढीत असताना उखळी येथील एक ऑटो येथे आला त्यातील प्रवाशांना खाली उतरताना धवसे यांचा धक्का लागला त्यावेळी ऑटोतील महिलने धवसे माय लेकांना शिवीगाळ केली. ही शिवीगाळ ऐकून काही जण येथे जमा झाले. त्यांनतर हा वाद विकोपाला केला त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
यात मायाबाई धवसे, प्रमोद धवसे, विनोद धवसे यांच्यासह इतर दोघे जखमी झाले जखमी धवसे कुटूंबीना उपचारासाठी वाशीम येथील रुग्णायात दाखल करण्यात आले. तर इतर जखमीची नावे समजु शकली नाहीत. जखमी उखळी येथील श्री. इंगोले यांचा समावेश आहे. दरम्यान, या हाणामारीत मायाबाई धवसे यांच्या गळ्यातील पोत हरवली असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यत पोलिस चौकीत तक्रार दाखल झाली नव्हती.