चेक वटला नाही आरोपीस तीन महिन्याची शिक्षा
चेक वटला नाही आरोपीस तीन महिन्याची शिक्षा
लातूर -धनादेश न वटल्याने आरोपी उषा व्यंकटराव मंदाडे ,रा. लातूर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब दुसरे श्री.एस.बी.शेख यांनी आरोपीस कलम 138 नि.ई.अॅक्ट प्रमाणे तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा व रू.5000 /-दंड व दंड न भरल्यास आठ दिवसाची शिक्षा तसेच धनादेशाची रक्कम रू.60000/- फिर्यादीस परत करण्याची शिक्षा आरोपीस सुनावली.
सदरील प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी मदिनाबी युसूफ शेख यांच्या कडून आरोपीने हातऊसणी रक्कम रू60000/- घेतली होती. व सदरील रक्कम दोन महिन्याच्या आत परत करण्याची हमी व आश्वासन दिले होते. परंतू आरोपीने सदरची रक्कम मुदतीत परत केली नाही.आरोेपीने फिर्यादीस सदरील रक्कमेच्या परतफेडीसाठी रक्कम रू.60000/- चा यशवंत नागरी सहकारी बॅक.लि. लातूर धनादेश दिला व सदर धनादेश वटविण्याची हमी दिली.
फिर्यादिने सदरचाा धनादेश बॅकेत वटविण्याकरिता लावला. असता आरोपीच्या बॅकेने अपुरा निधी असा शेरा मारून सदरचा धनादेश न वटविता परत केला. त्यामुळे फिर्यादीने आरोपीस आपल्या वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशाच्या रक्कमेची मागणी केली. परंतु आरोपीने मुदतीत सदरची रक्कम फिर्यादीस परत केेली नाही. त्यामुळे फिर्यादी मदिनाबी युसूफ शेख यांनी आरोपी विरूध्द मुख्य न्यायदंडाधिकारी लातूर यांच्या न्यायालयात योग्य त्या कागदपत्रासह मुदतीत फिर्याद दाखल केली. सदर प्रकरणाची सुनावणी मे. दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब लातूर यांच्या न्यायालयात झाली असता मा.न्यायालयाने फिर्यादीने दाखल केलेला पुरावा ,आरोपीचा बचाव आणि फिर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा व रू.5000/- दंड तसेच धनादेशाची रक्कम रू.60000/- फिर्यादीस दोन महिन्याच्या आत परत करण्याचा हुकूम दिला व ते पैसे भरले नाहीत तर नंतर दोन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा आरोपीस सुनावली.
सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड.बळवंत ह. जाधव, अॅड.अर्जुन ह. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड.गौतम शिवाजीराव गायकवाड, अॅड.पुनम व्ही.सुरकुटे व अॅड. सुनिता प्र. जाधव यांनी साहय केले.