95 ग्रामंपचातच्या प्रभाग रचना आरक्षणाचे काम पुर्ण

95 ग्रामंपचातच्या प्रभाग रचना

 आरक्षणाचे काम पुर्ण

हिंगोली - तालुक्‍यातील 95 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना आरक्षणा बाबत तीन टप्प्यातील कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रीया पुर्ण झाली असून त्‍याच्या याद्या संबधीत गावातील चावडीवर लावण्यात आल्या आहेत. 

 

दरम्‍यान , या बाबत कोणाचा आक्षेप किंवा हकरत असेल तर शुक्रवारपर्यत (ता.१४) नोंदविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी केले आहे. तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जुलै ते डिसेंबर 2020 या कलावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी हिंगोली तालुक्‍यातील 95 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणा बाबत एक ते तीन टप्प्यातील कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

 

त्‍यानुसार पहिल्या टप्प्यात सदस्यांची संख्या, प्रभागाचे विभागजन करणे, जागा राखुन ठेवणे त्‍यानंतर आरक्षणासाठी सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे संबधीत तलाठी, ग्रामसेवक यांनी स्‍थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चीत करणे व अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती यांचे आरक्षण निश्चीत करणे बाबत विशेष ग्रामसभा घेण्यात येवून प्रभाग रचना व आरक्षण करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. आरक्षणची यादी गाव चावडीवर लावण्यात आली आहे. त्‍यावर आक्षेप किंवा हरकत असल्याचे तो शुक्रवारपर्यत (ता.14) नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

दरम्‍यान, तालुक्‍यातील 95 गावात गाडीबोरी, कडती, करंजाळा, लिंबाळा, लोहगाव, माळहिवरा, पहेणी, पांगरी, पारडा, फाळेगाव, पिंपरखेड, सवड, सावरगाव बंगला, उमरखोजा, येळी, बोराळा, डिग्रसवाणी, हिवराबेल, इंचा, जामठी बुद्रुक, कलगाव, कारवाडी, खानापूर चिता, खरबी, लिंबी, माळधामणी, पिंपळखुटा, वांझोळा, वराडी, कळमकोंडा बुद्रुक, बळसोंड, बासंबा, भिंगी, चिंचोली, जयपुरवाडी, जाभंरुण आंध, जाभरुण तांडा, कन्हरेगाव नाका, खेड, नादुरा, पारोळा, राहोली बुद्रुक, सागद, सरकळी, वेजापूर, बेलस, भिरडा, बोडखी, बोरजा, चिंचाळा, देवठाणा, डिग्रस कऱ्हाळे, दुर्गधामणी, हिंगणी, हिरडी, खंडाळा, पिंपळदरीतर्फे बासंबा, टाकळीतर्फे नांदापूर, अंभेरी, दुर्गसावंगी, अंधारवाडी, बोंडाळा, बोराळवाडी, बोरीशिकारी, देऊळगाव रामा, गिलोरी, इसापूर, पेडगाव, नरसी नामदेव, राजुरा, साटंबा, सिरसम बुद्रुक, उमरा, आमला. भोगाव, खांबाळा, आंबाळा, भांडेगाव, जोडतळा, दाटेगाव, कानडखेडा खुर्द, लासीना, खडकद बुद्रुक, वरुडगवळी, नवलगव्हाण, खेर्डा, पातोंडा, समगा या गावाचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तहसीलदार एम. जी. खंडागळे यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा