वसमत येथे 8,43,468 रुपयाचा गुटखा आढळला
वसमत येथे 8,43,468 रुपयाचा गुटखा आढळला
परभणी येथील औषध प्रशासनाने तपासणी करून गोडाऊन केले सील
वसमत - येथे परभणी येथील अन्न व औषध प्रशासनातर्फें सोमवारी (ता.10) प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या अनुषंगे तपासण्या केला असता शहरात दोन ठिकाणी 8 लाख 43 हजार 468 रुपयाचा गुटखा जप्त करून गोडाऊनला सील करण्यात आले आहे.
या बाबत माहिती अशी की, परभणी येथील अन्न व औंषध प्राशसनातर्फे सोमवारी वसमत येथील भेट देवून मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेले कॉम्प्लेक्स मधील खालिद शेख यांच्या मालकीच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला 8 लाख 35 हजार 328 रुपयाचा अन्नपदार्थ आढळून आला असून हे गोडाऊन सील करण्यात आले आहे. सदर गोडाऊन मुझाहेद खान नसीब खान पठाण यांना भाड्याने दिले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या गोडाऊन मध्ये सुद्धा प्रतिबंधित गुटखा व पानमसला आढळून आला. आयुक्तांच्या आदेशान्वये सदर गोडाऊनला सील करण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केली असता घराच्या बोळीत मध्ये 8140 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसला आढळुन आला आहे. सदर दोन्ही कारवायांत एकूण 8,43,468 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायमध्ये मुझाहेद खान नसीब खान पठाण व भागवत मारकोळे यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्या नुसार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.
सदर कारवाईसह आयुक्त श्री, वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे , अन्न सुरक्षा अधिकरी अनुराधा भोसले, प्रकाश कछवे, अरुण तमडवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.