सीईओ डॉ. तुमोड यांचीऔरंगाबाद येथे बदली

सीईओ डॉ. तुमोड यांचीऔरंगाबाद येथे बदली

 

हिंगोली - येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हानमलू तुमोड यांची नवीन शहरे औरंगाबाद येथे मुख्य प्रशाशक म्हणून रिक्त पदी झाल्याचे आदेश अवर सचिवानी  गुरुवारी काढले आहेत.

 

दरम्यान, औरंगाबाद येथील नवीन शहरे मुख्य प्रशासक पदी मधुकर आर्दड यांची बदली अन्य ठिकाणी झाल्याने ते रिक्त पद झाले होते. त्या ठिकाणी हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. तुमोड यांची अव्वर सचिवाने नियुक्ती केली आहे. दरम्यान, सीईओ तुमोड हे यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली. परत डॉ. तुमोड यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी तीन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना भाप्रसे कॅडर मिळाले. मागील तीन वर्षा पासून तुमोड यांनी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात चांगला दुवा निर्माण करून खेळी मेळीचे वातावरण निर्माण केले. रेखावार यांच्या वर पदाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर तुमोड यांची सीईओ पदी नियुक्ती झाली. चांगल्या अधिकाऱ्यांना हा जिल्हा कठीण जाणारा ठरला, त्यामुळे जिल्हा परिषदेने कर्तव्य दक्ष रेखावार या अधिकाऱ्यावर अविश्वास ठराव पारित करून त्यांना स्वार्थासाठी हिंगोली सोडण्यास भाग पाडले, रेखावार यांनी शिस्त प्रिय म्हणून ओळख निर्माण केल्याने पदाधिकाऱ्यांचे काहीच जमत नव्हते, त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनी त्यांची बदली केली. त्यानंतर डॉ. तुमोड यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर मागील तीन वर्षात पदाधिकाऱ्यांनी आपले सूत्र जुळवीत तुमोड यांच्यावर विश्वास दाखवीत चांगभले करून घेतली. आता तुमोड यांची प्रशासकीय बदली झाल्याने याठिकाणी कोणता अधिकारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा