सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा

सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या


  बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करावा


                                                                              -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


*एकही पात्र शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये


*जिल्हयात 72 हजार 6 शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र


*अन जिल्हाधिकारी यांनी खातेदारांशी संपर्क करुन आधार क्रमांक मागितला.


 


            लातूर,दि.13:-राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहिर केलेली असून या अंतर्गत 2 लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे. लातूर जिल्हयातील सर्व बँकांकडे 2 लाख मर्यादेपर्यंतचे 72 हजार 6 शेतकरी खातेदार या योजनेस पात्र आहेत.यातील 69 हजार 236 शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी  त्यांचा आधार क्रमांक लिंक करण्यात आलेला आहे. तरी उर्वरित 2 हजार 770 खातेदारांचा आधार क्रमांक तात्काळ बँक खात्याशी लिंक करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.


      जिल्हाधिकारी  कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरबीआयचे ए.जी.एम. सुनील वाघ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी, जिल्हा ॲग्रणी बँक व्यवस्थापक पी.श्रीनिवासन, नाबार्डचे एम.एन.रायवाड, जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.


        जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, जिल्हयातील सर्व बँकांनी पात्र शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्तीचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी त्वरित संलग्न करावेत. व योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यास जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ तात्काळ मिळावा. या योजनेच्या लाभापासून एक ही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची सर्व संबंधित बँकर्सनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.


        जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांकडे एकूण 72 हजार सहा शेतकरी खातेदार  या योजनेच्या लाभास पात्र असून या सर्व खातेदारांपैकी 69 हजार  236 खातेदारांचे बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक झालेला आहे. तर उर्वरित 2 हजार 770 खातेदारांचे आधार लिंकिंगचे काम दिनांक 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण झाले पाहीजे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगून यातील 62 हजार 728 खातेदारांचा डाटा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्याची माहिती देऊन उर्वरित डाटा ही तात्काळ अपलोड करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणेच पी.एम. किसान योजनेतील शेतकऱ्यांचे ही आधार लिंकिंगचे काम तात्काळ करण्याचे आवाहन त्यांनी केले.


        एन.आर.एल.एम. अंतर्गत महिला सक्षमीकरणांचा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. तसेच या अंतर्गतचे सर्व महिला महिला बचत गट घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. त्यामुळे बँकांनी या अंतर्गत आलेले कर्ज मंजुरीची सर्व पात्र प्रकरणे तात्काळ मंजूर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी  केले. तर सर्व महामंडळामार्फत सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविल्या जात असून यातील एक ही प्रकरण प्रलंबित ठेवू नये, असे त्यांनी आवाहन केले.


         यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कर्जमुक्ती योजनेबरोबरच पी.एम. किसान, मुद्रा बँक योजना, मुख्यमंत्री स्वंयरोजगार निर्मिती योजना, महामंडळाच्या योजना, बँकाच्या पतपुरवठा आदि बाबींचा सविस्तर आढावा घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून पुरस्कृत कोणत्याही प्रकारच्या योजनेची कर्ज पुरवठा प्रकरणे वेळेत मार्गी लावून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन त्यांनी केले.


        प्रारंभी जिल्हा ॲग्रणी बँक व्यवस्थापक पी. श्रीनिवासन यांनी सभेचा अजेंठा मांडला. तसेच जिल्हा उपनिबंधक श्री. जाधव यांनी प्रत्येक बँकेकडे आधार लिंक न केलेल्या शेतकरी खातेदाराची आकडेवारी देऊन तात्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन केले.


बँकर्सचे प्रशिक्षण :-


          राज्य शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांचा लाभ देताना बॅकांनी पार पाडावयाची भूमिका याबद्दल सविस्तर माहिती देणारी दृकश्राव्य  चित्रफीत  तयार केली असून आजच्या  बैठकीत सर्व बँकर्सना सदरची चित्रफीत दाखवून  प्रशिक्षण देण्यात आले.


सामाजीक न्याय योजना दिनदर्शिकाचे विमोचन :-


     विशेष घटक येाजना सन 2019-20 अंतर्गत सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या विविध योजनावर आधारीत सन 2020 ची दिनदर्शिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या  वतीने तयार करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मान्यवरांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.


कॅनरा बँक व इतर काही बँकांच्या समन्वयांकडून महात्मा फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेंतर्गत संपर्क वारंवार करुन ही लाभार्थी आधार क्रमांकासाठी प्रतिसाद देत नसल्याची तक्रार केली.


कॅनरा बँकेचे संबंधित शाखा व्यवस्थापकांकडून पात्र लाभार्थी सौ. चंद्रकला त्र्यंबक शिंदे या शेतकरी खातेदारांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मोबाईलवरुन फोन केला. सौ. चंद्रकला शिंदे यांचे पती श्री. त्र्यंबक शिंदे हे यांच्याशी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी मोबाईलवरुन सौ. चंद्रकला यांचा आधारक्रमांक तात्काळ देऊन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


जिल्हाधिकारी यांच्या फोन कॉल ला श्री. शिंदे यांनी दोनच मिनिटात प्रतिसाद देऊन आधारक्रमांक दिला.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा