किराणा दुकानात १५ हजाराची अवैध देशीदारु पकडली
किराणा दुकानात १५ हजाराची अवैध देशीदारु पकडली
वसमत - तालुक्यातील कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सेलू येथे एका किराणा दुकानातून १४हजार ९७६ अवैध देशीदारुच्या २८८ बॉटल जप्त करून रविवारी (ता.९) गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सेलू येथे संदीप गंलाडे यांच्या किराणा दुकानात सहा बॉक्स मध्ये १४हजार९७६ रुपये किमंतीच्या २८८ बॉटल चोरटी विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यात बाळगुण असताना आढळून आला. त्याला गोविंद भोसले राहणार आंबाचोंडी हा देशीदारुचा माल पुरवठा करत असल्याचे संदीप गलांडे यांनी सांगितले. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गोपीनवाड यांच्या फिर्यादीवरून संदीप गलांडे व त्याला दारुच्या बॉटल विक्री करणारा गोविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कुरुंदा पोलिस करीत आहेत.