हिंगोली जिल्‍हा पोलीस दलातर्फे मॅरेथॉन स्‍पर्धेचे आयोजन

हिंगोली जिल्‍हा पोलीस दलातर्फे मॅरेथॉन स्‍पर्धेचे आयोजन

 

हिंगोली - येथील जिल्‍हा पोलीस दलातर्फे एकात्‍मता संदेशासाठी रविवारी (ता.२३) सकाळी साडेसहा वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पाच किलोमीटरच्या मॅरेथॉन स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या स्‍पर्धेसाठी अठरा वर्षावरील महिला व पुरुषांनी सहभाग घेवून या स्‍पर्धा यशस्‍वी करण्याचे आवाहन जिल्‍हा पोलीस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐ. जी. खान, रामेश्वर वैजणे, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, श्री. सय्यद, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे. 

 

या स्‍पर्धेत सहभागी होणारे स्‍पर्धेक निरोगी असावेत सर्व सहभागी स्‍पर्धेकांना टीशर्टचे वाटप केले जाणार आहे. तसेच स्‍पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषीक व ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्‍पर्धा सकाळी साडेसहा वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर सुरू होणार असून ती इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक, बिरसामुंडा चौकातून जुने जिल्‍हा  परिषदेकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याने पाण्याच्या टाकीपासून पुन्हा अग्रसेन चौक येथून इंदिरा गांधी चौकातून संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे संपणार आहे. 

 

स्‍पर्धे दरम्‍यान, अग्रसेन चौक, बिरसामुंडा चौकात पाणी व एनर्जी ड्रिंक्‍सची व्यवस्‍था करण्यात आली आहे. स्‍पर्धा संपल्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्‍था करण्यात आली आहे. तसेच टिम स्‍वरगंधारतफें म्युजीक ईव्हेन्टचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या स्‍पर्धेत जास्‍तीत जास्‍त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विविधतेचा संदेश  देण्यासाठी एकत्र यावे असे आवाहान पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांनी केले आहे.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा