महात्‍मा फुले कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू, 233 लाभार्थ्याची यादी प्रसिध्द

महात्‍मा फुले कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू 

समगा, खरबी गावातील 233 लाभार्थ्याची यादी प्रसिध्द

 

हिंगोली ः जिल्‍ह्‍यात महात्‍मा ज्‍योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू झाली असून कर्जखात्याशी आधार जोडणी झाली आहे. हिंगोली तालुक्‍यातील समगा व खरबी गावातील 233 शेतकरी लाभार्थ्याची यादी सोमवारी (ता.24) प्रसिध्द करण्यात आली आहे. 

 

याबाबत या दोन्ही गावात जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसीलदार मधुकर खंडागळे, सहाय्यक निंबधक जिंतेद्र भालेराव यांनी या गावात भेट देवून आधार प्रामाणिकरणाच्या कामकाजाची पाहणी केली. यासाठी तहसील व उपनिंबधक कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.   

 

दरम्‍यान, जिल्‍ह्‍यात महात्‍मा ज्‍योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेत आतापर्यत 1 लाख 5 हजार 690 शेतकऱ्याचे कर्जखात्याशी आधार जोडणी झाली असून त्‍यापैकी 96 हजार 995 शेतकऱ्याची माहिती पोर्टलद्वारे अपलोड करण्यात आली आहे. अद्यापही 3500 शेतकऱ्यांनी विनाविलंब त्‍यांचे ओळखपत्र संबधित बँक शाखेत देवून आधार जोडणीचे कामकाज पुर्ण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन योजनेसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्‍हास्‍तरीय समितीने केले आहे. 

 

या योजनेच्या अमंलबजावणी अंतर्गत पायलट प्रामाणीकरणासाठी हिंगोली तालुक्‍यात येणाऱ्या समगा व खरबी या दोन गावाची निवड करण्यात आली असून समगा येथून 147 व खरबी येथून 86 लाभार्थी असे एकुण 233 शेतकरी लाभार्थ्याची यादी संबधीत गावात सोमवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्‍यानंतर या लाभार्थ्याचे आधार प्रामाणीकीकरणाचे काम सुरळीतपणे सुरू झाले आहे. समगा येथील व खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत बायोमॅट्रीक पत्राद्वारे हे आधार प्रामाणीकीकरणाचे काम करण्यात येत आहे. 

 

समगा व खरबी या दोन गावातील बँक निहाय लाभाथी संख्या पुढील प्रमाणे आहे. यात समगा येथील आलाहबाद बँकेत 1 लाभार्थी, बँक ऑफ इंडीया 28 लाभार्थी, स्‍टेट बँक ऑफ इंडिया 22 लाभार्थी, युनियन बँक ऑफ इंडिया 96 असे एकूण 147 लाभार्थी तर खरबी येथे बँक ऑफ बडोदाचे 86 लाभार्थी असे एकूण 133 लाभार्थ्याचा यात समावेश असल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांनी दिली.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा