पुण्याच्या पल्लवी बोरकर (विवाहित गट) आणि प्राजक्ता राजे भोसले (अविवाहित गट) ठरल्या 'महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी' राज्यस्तरीय स्पर्धेच्या मानकरी.


पुण्याच्या  पल्लवी बोरकर (विवाहित गट)


आणि  प्राजक्ता  राजे भोसले (अविवाहित गट)


ठरल्या 'महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी' राज्यस्तरीय स्पर्धेच्या मानकरी.  



अनिल चौधरी पुणे -

 

 एऑन इवेंट्स व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी या  राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात​ नुकतीच पार पडली. राज्याच्या विविध शहरांमधुन या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. मुंबई, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, नागपूर आणि पुण्यातील स्पर्धकांची निरनिराळ्या चाचण्यांमधून अंतिम फेरी साठी निवड करण्यात आली होती. यंदा पुण्याची पल्लवी बोरकर (विवाहित गट)आणि  प्राजक्ता राजे भोसले (अविवाहित गट) या 'महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी' कीताबाच्या मानकरी ठरल्या तर विवाहित गटात स्मिता गिरी व शीतल गायकवाड तर अविवाहित गटात भारती भोसले आणि जान्हवी इंगळे यांना  अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळाले.


 


स्पर्धकांना माधवी घोष आणि  जिया नंदा यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले होते. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारातील दिव्यांग मुली आणि महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून या व्यासपीठाची राजदूत पुण्याची गौरी गाडगीळ आहे. तिने या कार्यक्रमात भरतनाट्यम् सादर केले होते. नृत्य, गायन तसेच विविध कला सादरीकरणासाठी राज्यभरातील दिव्यांगांच्या १२ संस्थांतील मुलींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्या सर्वांनाच मान्यवरांच्या हस्ते मुकुट परिधान करण्यात आला त्या वेळी त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.


स्पर्धेचे परीक्षण डॉ. अंजली जोशी, डॉ. सुनीता मोरे, अंजना मस्करहेनस, चंद्रकला सानप, शुभांगी शिंत्रे आणि अर्चना जैन यांनी केले होते. शिंत्रे  आणि जैन या अंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या असून या कार्यक्रमासाठी त्यांना 'विशेष अतिथी' म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धे मध्ये बेस्ट फेस, बेस्ट स्माइल, बेस्ट वॉक, बेस्ट इंटेलिजेंट आणि बेस्ट आयकॉनिक या शीर्षकांतर्गतही दोन्ही गटात  बक्षिसे देण्यात आली. स्पर्धकांना प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर संदीप वर्पे यांच्या कडून पोर्टफोलिओ करुन देण्यात आला. सर्व स्पर्धकांना नऊवारी साड्या नक्षत्र डिझाईन्स कडून तर अलंकार आणि महाराष्ट्राची ओळख असलेल्या इरकली साड्या कल्याणी आणि श्रद्धा यांनी उपलब्ध केल्या होत्या.


कार्यक्रमाला माजी नगरसेवक ॲड. योगेश  मोकाटे, विराज पाटील, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे, नगरसेवक विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष मेहबूब शेख, पिडीसीसी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष पिंपरी चिंचवडच्या वर्षा जगताप, शाहू कॉलेज चे प्राचार्य राजेंद्र कोळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष पूजा बुट्टे पाटील, मारुती पाटील, डॉ. रमेश गिरी आणि नाना निवंगुणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सोनम पाटील यांनी केले होते.



Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा