सर्व माल वाहतुक व्यवसायिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे
सर्व माल वाहतुक व्यवसायिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावेलातूर,
कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 अंतर्गत माल वाहतुक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/मालाची घरपोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे ,वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक यांनी कॉमन कॅरीअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 अंतर्गत विना नोंदणीकृत माल वाहतूक करणाऱ्या कुरिअर कंपन्या व वैयक्त्कि व्यवसाय करणाऱ्या कुरिअर एजन्सी विरुध्द उक्त अधिनियमाच्या कलम 18 नुसार कारवाई करण्याचे मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. 74/2017 मध्ये दि. 31 जुलै 2019 रोजी आदेशित केले आहे.
त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या कुरिअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर उजन्सी यांना अवगत करण्यात येते की, कॅरेज बाय रोड अधिनियम ,2007 अंतर्गत संबंधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून सदर नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे अन्यथा, मोटार वाहन अधिनियम तसेच कॅरेज बाय रोड अधिनियम , 2007 च्या नियम -18 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे. कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध् आहेत.
बेवारस ट्रॅक्टर व ट्रॉली वाहनाबाबत संबंधित मालकाने कागदपत्रे सादर करावेत
लातूर,दि.12:- चाकूर येथील जनतेला सुचित करण्यात येते की, चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील नमुद केलेला बेवारस वाहन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 82 प्रमाणे कार्यवाही करुन ज्या कोणा व्यक्तीच्या मालकी हक्क असेल त्या व्यक्तीने हे जाहीर प्रकटन प्रसिध्द झाल्यापासून दोन महिन्याच्या आत कायदेशीर मालकी संबंधाचे कागदपत्रासह पोलीस निरीक्षक ,पोलीस स्टेशन चाकुर यांचेकडे सादर करावेत.
विहीत मुदतीमध्ये कोणाचाही मालकी हक्क सिध्द नाही झाल्यास कोणाचीही काहीही तक्रार नाही असे गृहीत धरुन पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 व फौजदारी प्रक्रिया सहीता 1973 चे कलम 458 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सदरचे वाहन 15 वर्षापासून सतत पावसात व उन्हात राहुन कुजून गेल्याने व झीज झाल्याने त्याचे पासींग नंबर, इंजीन नंबर व चेसी नंबर दिसुन येत नाही. ट्रॅक्टर हेड व ट्रॉली हे बेवारस वाहन आहे असे , पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चाकूर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.