सर्वसामन्यांचे जेवण महागले ! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांची घसघशीत वाढ
सर्वसामन्यांचे जेवण महागणार! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांनी वाढ, असे आहेत मुंबईतले आजचे दर
आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत.
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.
आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.