Posts

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

Image
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन हिंगोली - जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट देण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता.७) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी जाऊन घेराव घालून गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यात मागील वर्षात खरीप हंगामात जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांनी पीक पाहणी केली होती. त्यानंतर  पीक पाहणी प्रयोग विमा कंपन्यांकडून करण्यात आला होता. तर शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान होऊ नये म्हणून  पीक विमा कंपनींनीने शेतकऱ्यांना विम्याचा परतावा दिला नाही. तीन वर्षापासून कृषी विभागाकडून व कंपन्यांकडून थट्टा केली जात असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (ता.३०) डिसेंबर रोजी कृषी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात सात जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने व कृषी विभागाकडून काही प्रयत्न होत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी कृषी अधीक्षक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला, त्यावेळी म...

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा

Image
  ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा हिंगोली - येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को. ऑप. बँकेला मागील आर्थिक वर्षात ३.१५ कोटीचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सुनील देवडा यांनी ऑनलाइन झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालकांना दिली. मंगळवारी बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली  (ता.२२) सर्व साधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश सोनी,संचालक विठ्ठलदास धनावत ,नरेंद्र मोदी, नरेंद्र अग्रवाल,प्रकाश गोयल,बजरंगलाल अग्रवाल ,डॉ. हंसादेवी बगडीया ,सुभद्रादेवी मंत्री,ज्ञानेश्वर मामडे,शशिकांत दोडल,राजेंद्र  निमोदिया ,गजानन देशमुख,आशिष काबरा,विजय अग्रवाल,राजेश अग्रवाल,राजू मुदिराज,एम. एम. बुद्रुक, राजेश कयाल ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जोशी,सहाय्यक व्यवस्थापक  संजय राजेश्वर , दिलीप देशपांडे,कंदी आदींची उपस्थिती होती. यावेळी नोटीसीचे वाचन करण्यात आले. ओमप्रकाश देवडा पीपल बँकेचा आलेख अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली दिवसेंदिवस वाढत असून बँकेची वाटचाल प्रगतीकडे चालू आहे. दरम्यान, मंगळवारी बँकेत ३८वि वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स...

लसीकरणसाठी डॉक्टरांना कोविल ऍप वर नोंदणी करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Image
  लसीकरणसाठी डॉक्टरांना कोविल ऍप वर नोंदणी करणे बंधनकारक -  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हिंगोली -  कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जानेवारी महिन्यात  लस उपलब्ध होणार असल्याने पहिल्या टप्यात शासकीय डॉक्टर, खाजगी डॉक्टर, नर्स यांना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविल ऍप वर सर्वांनी नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले. येथील जिल्हा नियोजन सभागृहात बुधवारी कोरोना लसीकरनाच्या पूर्व तयारीसाठी  उपययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय प्रतिनिधी मुजीब सय्यद यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या बैठकीला उपविभागीय अधिकारी, अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर ,महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी. पावसे ,बालविकास प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती. ...
Image
  महाआवास योजनेत राज्यात प्रथम येण्यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे -  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा परिषदेत महाआवास अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा   हिंगोली,-  महाआवास अभियान  ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्देशाची कामगिरी कौतुकास्पद असून राज्यात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेच्या  जिल्हास्तरीय आयोजित कार्यशाळेत अधिकाऱ्यांना गुगल मिटद्वारे ऑनलाईन सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्हास्तरीय  कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी सकाळी ११.०० वा करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, आत्माराम बोन्द्रे, डॉ.मिलिंद पोहरे,व्ही.पी. राठोड, उमेश स्वामी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्यकार्यकारी अधिकारीराधाबीनोद शर्मा  म्हणाले २०२२ पर्यंत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्व पूर्ण असुन तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे अशा ...

हिंगोली - लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

  लाचखोर तलाठ्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी  हिंगोली -    ऑनलाइन फेरफार करण्यासाठी एका शेतकर्यांकडून पाच हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्यास मंगळवारी (ता.२२) रोजी  न्यायालयासमोर उभे केले असता लाचखोर तलाठयास चौदा दिवसांची न्यायालय कोठडी देण्यात आली असून त्यास परभणी कारागृहात रवानगी केली आहे. कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील तलाठी बेले  यांनी तक्रार दाराच्या शेताचे ऑनलाईन फेरफार मध्ये दुरुस्ती करून देतो म्हणून पाच हजाराच्या लाचेची मागणी तक्रादाराकडे केली होती.तसेच तहसील कार्यालयातील ऑनलाईनची कामे करणारे कोतवाल हमीद यांच्याकडे रकम देण्याचे सांगितले होते.त्यानुसार तक्रारदाराने १६ डिसेंबर रोजी तलाठी बेले यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत कार्यालयात केली. त्यानुसार   लाचलुचपत विभागाचे प्रभारी पोलीस उपधीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने या प्रकरणी पडताळणी केली असता यात कोतवाल हमीद याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे स्पस्ट झाले.यावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला होता.यावरून त्या लाचखोर बेले तलाठी व कोतवाल हमीद य...

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Image
  काकडदाभा  येथे अनेकांचा  आमदार  बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत  प्रवेश औंढा नागनाथ :- कळमनुरी विधानसभा मतदार संघातील काकड दाभा येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष  बांगर यांच्या  नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी  नगरसेवक रामभाऊ कदम, माजी सरपंच आबासाहेब मुरकुटे, माजी सरपंच जनार्धन काळे, चेअरमन मारुतराव काळे, उपसरपंच विठ्ठलराव काळे, ज्योतिबा सरकटे,  उत्तम सरकटे शामराव बोचरे, काशिनाथ काळे, नथू पोटे, सारंग टारफे, संदीप सरकटे, गुलाब पाईकराव, अनिल पाईकराव विलास सरकटे संजय सरकटे, उत्तम सरकटे, हनवता खंदारे, रवी सरकटे,  राहुल सरकटे,  सुभाष सरकटे, अश्विन पाईकराव, विकी सरकटे, रविकांत सरकटे, शिवाजी सरकटे रमेश सरकटे, बाळू सरकटे, सिद्धार्थ सरकटे,  विजय सरकटे, मधुकर सरकटे, राधेशाम सरकटे, बाबाराव काळे, सुभाष काळे, विठ्ठल काळे, शेकुराव काळे, यादव काळे देविदास काळे गजानन काळे, विलास वाळके, धोंडबा वाळके, माणिकराव बोचरे, बळीराम भिसे, गंगाराम काळे, पांडुरंग काळ...

वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ? ही निवडणूक बुध्दिवाद्यानची....

वंचित ,प्रहार जनशक्ती, बंडखोर उमेदवारांची मते कोणाच्या पथ्यावर की या पैकीच कोणी ? ही निवडणूक बुध्दिवाद्यानची.... विलास जोशी -----------------  हिंगोली -  औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी( ता.१) होत असल्याने या निवडणुकीत वंचित व भाजप बंडखोर उमेदवाराची मते निर्णायक ठरणार असून कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी कळणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत्तीची श्यक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण ,भाजप मित्र पक्षाचे शिरीष बोराळकर ,वंचित आघाडीचे प्रा. नागोराव पांचाळ तर भाजपचे निष्ठावंत असलेले रमेश पोखळे यांना डावलल्याने ते देखील बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात आपले भवितव्य अजमावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.तसेच महाविकास आघाडीतून बंडखोरी करीत दिलीप घुगे देखील निवडणूक लढवीत आहेत.तर विध्यार्थी प्रिय, अनेक आय ए एस अधिकारी कलासेसच्या माध्यमातुन बनवलेले सचिन ढोबळे सर यामुळे तुल्यबळ लढतीत सतीश चव्हाण ह्याट्रिक करणार की, त्यांचा विजयाचा रथ रोखण्यात शिरीष बोराळकर यांना यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवाद...